हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये S.M.Joshi College राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तीन दिवसीय केमिफेअर-2024 चे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रश्नमंजूशा स्पर्धा, मॉडेल मेकिंग, गेस्ट मॅजिक एक्स्पेरीमेट्स, रांगोळी स्पर्धा इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. S.M.Joshi College
साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतला. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुना कॉलेजचे डॉ.अविनाश सिंग उपस्थित होते.
सर्व स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य संजय जड़े, उपप्राचार्य डॉ.संजय, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.शहाजी करांडे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.रंजना जाधव यांनी केले. स्पर्धांचे संयोजन प्रा.सचिन शिंदे, प्रा.मोनिका शेळके, प्रा.काजल गौडदाब, प्रा.अश्विनी गायकवाड, प्रा.माधुरी तुपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.


हे ही वाचा :
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा