Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

हायजॅक झालेल्या “त्या” जहाजाची सुटका, सर्व भारतीय सुरक्षित

मुंबई : अरबी समुद्रात लायबेरियाच्या एका मालवाहू जहाजाचे अपहरण केलेल्या जहाजाची सुटका करण्यात आली आहे. नौकेवरील कर्मचार्‍यांनी ५-६ सशस्त्र लुटेर्‍यांनी नौकेमध्ये घुसखोरी केल्याचा संदेश भारतीय नौदलाला पाठवला होता.

---Advertisement---

अपहरणाची माहिती मिळताच सागरी गस्त घालणारे भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस चेन्नई रवाना केली होती. काही वेळापूर्वी अपहरण झालेल्या जहाजाजवळ पोहोचली. भारतीय कमांडो अपहरण झालेल्या जहाजात चढले आणि ऑपरेशन यशस्वी केले. अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफोक विमानातील सर्व भारतीय सुरक्षित आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय नौदलाचे मरीन कमांडोंनी ऑपरेशनसाठी यशस्वी केले आहे. नौदलाचे हेलिकॉप्टरही अपहरण झालेल्या जहाजावर लक्ष ठेवून आहे. तसेच, जहाजावरील सर्व 21 क्रू (15 भारतीयांसह) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

---Advertisement---

दरम्यान, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध शक्य तितक्या कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles