Thursday, December 12, 2024
HomeNewsडॉ. कफील खान यांच्यावरील रासुका कारवाई रद्द करा, डीवायएफआयची तीव्र निदर्शने.

डॉ. कफील खान यांच्यावरील रासुका कारवाई रद्द करा, डीवायएफआयची तीव्र निदर्शने.

तळोदा : डॉ. कफील खान यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) कारवाई रद्द करून जेल मधून मुक्त करण्याच्या मागणीसाठी घेऊन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) च्या वतीने गुंजाळी येथे निदर्शने करण्यात आली.

डॉ. कपिल खान हे गोरखपूर येथील बी. आर. डी. मेडिकल कॉलेजच्या सरकारी दवाखान्यात प्रमुख डॉक्टर होते, २०१७ मध्ये  ठेकेदारांच्या लापरवाहीमुळे ६३ बालकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या आरोग्य विभागावर टीका करून सरकारचा रोष पत्करला होता, सरकारने त्यांना निलंबित केले. त्यांच्यावर केलेले आरोप चूकीचे आहेत हे नंतर सिद्ध झाले. 

त्यानंतर यूपी पोलिसांनी २९ जाने २०२०  रोजी मुंबई विमानतळावर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली, त्यांच्यावर नागरीकता संशोधन कायद्या विरोधात भाषण केले असा आरोप आहे, अद्यापही ते तुरुंगात आहेत. 

राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा दहशतवादी, गुंड, अतिरेकी संघटनां यांचे विरोधात वापर केला जातो. केंद्र आणि राज्य सरकारे त्याचा दुरुपयोग डॉक्टर, लेखक, कवी, लोकशाहीवादी सामाजिक कार्यकर्ते यांना तुरुंगात डाबण्यासाठी करत आहे, असे डीवायएफआय ने म्हटले आहे. 

यावेळी लोकशाही हक्कासाठी झगडणाऱ्या डॉ. कपिल खान यांची त्वरित सुटका करावी, कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा रद्द करावी, या मागण्या करण्यात आल्या. 

निदर्शनात डीवायएफआय चे जिल्हा सचिव सुदाम ठाकरे, जिल्हा कमिटी सदस्य गोरख ठाकरे, आकाश ठाकरे, दयानंद ठाकरे, जितेंद्र ठाकरे, सुधाकर पाडवी, राजेश ठाकरे, दीपक ठाकरे, संजय पाडवी, अक्षय ठाकरे, आकाश पावरा, धीरज ठाकरे इत्यादी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय