मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने दिला होता. यानंतर काल खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती.
आज राणा दाम्पत्याला वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. यावेळी सरकारी वकीलांनी राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर राणा दाम्पत्यांचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी विरोध केला. त्यानंतर कोर्टाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे.
ही अटक बेकायदेशीर आहे. दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. पोलिसांनी कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती त्यानुसार घराबाहेर पडले नाहीत. तेथे शिवसैनिक जमले त्यांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आलीये असंही अॅड रिझवान मर्चंट यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर रात्री गोळीबार