Thursday, September 19, 2024
Homeजिल्हाशिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार

वरुड : राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे वातावरण तापलं असतानाच अमरावती (Amaravati) मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घरड (Shiv Sena leader Yogesh Garad) यांच्यावर शनिवारी रात्री  प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेमुळे वरूड शहरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे नऊ वाजता वरूड शहरातील मूलताई चौक परिसरात दुचाकीवर दोन अज्ञात लोक तोंडाला दुप्पटा बांधून आले. त्यावेळी अज्ञातांनी योगेश घारड यांच्यावर दोनदा गोळीबार केला. एक गोळी हुकली व दूसरी गोळी पोटात उजव्या बाजूला लागली. या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. योगेश घारड यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, “या” पहिल्या पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी शे.घाट, मोर्शी, शिरखेड येथील पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला आहे.

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटक तर दोन आरोपी फरार झाले आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती अमरावती ग्रामीणचे अतिरिक्त एसपी शशिकांत सातव यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक शिवसैनिकांनी रविवारी वरुड बंदची हाक दिली आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

4 थी / 10 वी / 12 वी / Pharmacy विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोंदिया जिल्हा परिषदेत २५ हजार रूपये पगाराची नोकरी, 3 दिवस बाकी

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय