Rajgurunagar: लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आज शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पाया पडून नमस्कार केला. (Rajgurunagar)
वाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमनेसामने आले. डॉ. कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा, आढळराव पाटील भाषण करत होते. त्यांचं भाषण संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला.
त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पद येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिल.
एरवी प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे दोन्ही उमेदवार आज या कार्यक्रमावेळी शेजारी शेजारी बसलेले दिसले. त्यावेळी आढळराव पाटलांनी डॉ. कोल्हेंच संपूर्ण भाषण ऐकलं. भाषण संपल्यावर आढळराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले. तर डॉ. कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.
हे ही वाचा :
SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !
मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा
धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू
महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार