Pune : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा खराडी येथे तरंग २०२४ स्नेह संमेलन, माजी विद्यार्थी मेळावा आणि विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. (Pune) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन कोतवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे विभाग प्रमुख डॉ. आर. वाय. पाटील, पत्रकार राजेंद्रकुमार शेळके आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी विविध गुणदर्शन पर कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर सादरीकरण उपस्थितांची दाद मिळविली. माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी विविध शैक्षणिक वर्षातील एकूण ८० विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहिल्यामुळे महाविद्यालयाचे वातावरण खूपच उत्साही झाले होते. सर्वच माजी विद्यार्थ्याना कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना पाहून आनंद द्विगुणीत झाला. आपले विद्यार्थी मोठे होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव मोठे करत आहे हे पाहून शिक्षकांच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद दिसत होता.
आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवर्णीना उजाळा देत शिक्षकांचे ऋण व्यक्त कले. तसेच फार्मसी क्षेत्रात उच्चस्थ पदावर असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दिवसभराच्या जल्लोषपूर्ण वातावरणाचा सूर निरोप समारंभ सुरु झाल्यानंतर थोडा बदलला. आपल्या द्वितीय वर्षातील मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करून द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे विद्यार्थी भावूक झाले.
स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रा.अश्विनी सांडगे यांनी व प्रास्ताविक प्रा.अश्विनी बनकर यांनी केले. माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.मनोज जोगराणा यांनी आणि आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.सचिन कोतवाल यांनी केले. शुभेच्छा समारंभाचे प्रास्ताविक प्रा.प्रियंका बोरुडे आणि आभारप्रदर्शन प्रा.अश्विनी बनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. ज्योती दारकुंडे प्रा.ऐश्वर्या नीचळ, प्रा.स्नेहा वासनिक, ग्रंथालय प्रमुख कांचन बुचडे, अरूणा चिगरे, श्रीमती मनीषा झालटे, सतीश खोपकर, यासीन, जगदीश पठारे, सागर पठारे यांचे सहकार्य लाभले.


हे ही वाचा :
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू