Monday, December 23, 2024
Homeजिल्हाPune : विद्यार्थ्यांनो तुम्ही उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहात; सुरेंद्र पठारे यांचे...

Pune : विद्यार्थ्यांनो तुम्ही उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहात; सुरेंद्र पठारे यांचे प्रतिपादन

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल (दि. २२ जून) चंदननगर येथील न्यू प्रभूश्री लॉन्स येथे पार पडला. यावेळी ६८९ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. नुकत्याच दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते. मागील आठवड्यातही सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने येरवडा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. समारंभाच्या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक व प्राचार्य हेही हजर होते. (Pune)

समारंभाचे अध्यक्ष म्हणून वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे तसेच नामवंत व्याख्याते गणेश शिंदे, सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. (Pune)

“आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण व सजग नागरिक असतो. देशाचे उज्ज्वल भविष्य असतो आणि हे भविष्य घडविण्याचे काम निस्वार्थी वृत्तीने शिक्षक करत असतात. गुणवंतांच्या यशात त्यांचाही वाटा मोठा आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासाचे व मेहनतीचे हे फळ आहे. आज ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे; त्याच पद्धतीने पुढील शैक्षणिक आयुष्यातही मिळवतीलच”, असा विश्वास यावेळी सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.

“शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. तुमचे जगणे समृद्ध व्हावे यासाठी शिक्षण आहे. अभ्यास हा फक्त मार्कांसाठी करू नका. मार्कांच्या पलीकडे जाऊन अभ्यासाकडे पहा. अभ्यासाशी एकरूप होता आले तर खरी शिकण्याची मजा येईल. अभ्यास करून इतके मोठे व्हा, की आई वडिलांनी आपल्याकडे बघून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. स्वत:ला तुमच्या करियरसाठी झोकून द्या. लाथ मारीन तिथे पाणी काढील ही ताकद, आत्मविश्वास तुमच्या मनगटात व मनात पाहिजे,” असे व्याख्याते गणेश शिंदे यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने हा कार्यक्रम घेऊन आम्हा विद्यार्थ्यांचे कौतुक केल्याबद्दल आनंद वाटला. कार्यक्रमाच्या माध्यमातून करीयरच्या दिशेने चांगले मार्गदर्शनही लाभले, या शब्दांत विद्यार्थ्यांनी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

समारंभाचे अध्यक्ष बापूसाहेब पठारे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच, पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभासाठी विविध शाळा, महाविद्यालये तसेच सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय