Saturday, July 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPUNE : इंद्रायणी नदी प्रदूषण व संत भूमी साठी जन आंदोलन उभारणार...

PUNE : इंद्रायणी नदी प्रदूषण व संत भूमी साठी जन आंदोलन उभारणार : बाबा कांबळे

वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अठरा सेवेचे पुणे येथे उद्घाटन pune

रिक्षा चालक, कष्टकऱ्यांमार्फत पिंपरी ते पंढरपूर पर्यंत उपक्रमाचे आयोजन


पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा दिल्या जात आहेत. Pune

संघटनेचे पदाधिकारी या मध्ये सहभागी होतात. निगडी, पिंपरी बोपोडी आता पुणे, हडपसर येथे ही सेवा दिली जाणार आहे. पंढरपूर पर्यंत ही सेवा आम्ही देणार आहोत. वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे आहे. आगामी काळात इंद्रायणी नदी प्रदूषण रोखून संत भूमी टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले. Pune

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा मोफत दिल्या जातत. या उपक्रमाचे व हेल्पलाईनचे उदघाटन १ जुलै २०२४ रोजी पार पडले. पुणे येथे वारकरी मुक्कामी असताना संत देवाजी बाबा मंदिरासमोर सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते हा उदघाटन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड मधील निगडी, पिंपरी येथून तर पुणे येथे संत देवाजी मंदीरा समोर वारकऱ्यांची सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे‌‌ यांच्या नेतृत्वाखाली पुणे महाराष्ट्र पंचायतचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे बाळासाहेब ढवळे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार घर कामगार महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे, अंजली तांदळे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत वैद्य यांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कमेची, औषधे, गोळ्या, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्य मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, सल्लागार कुमार शेट्टी, सचिव किरण एरंडे, प्रवीण शिखरे, संजय शिंदे, विल्सन मस्के, नितीन भोंडवे, शाहरुख खान, विनय पाटील, संतोष गोसावी, अनिल वायदंडे, अमीर हमना यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय