Pune Lok Sabha : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात ‘मिशन 45 प्लस’ हे धोरण राबवत आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून देखील विशेष लक्ष घातले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्यासह अमित शहा यांच्या देखील महाराष्ट्रात सभा होत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील पुण्यात सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे महायुतीकडून मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली असून अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे बोलले जात असताना आता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होणार आहे. २९ एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. पुण्यातील एसपी रोडच्या मैदानावर ही प्रचारसभा होणार असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी पुण्यात कोणताही रोडशो होणार नाही असेही सांगितले जात आहे.
पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे.


हे ही वाचा :
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश