Friday, November 22, 2024
Homeजिल्हाPune : उत्कृष्ट ग्रामपंचायत योजना गुंडाळली

Pune : उत्कृष्ट ग्रामपंचायत योजना गुंडाळली

Pune : केंद्र सरकारच्या आदिम जमाती विकास कार्यक्रमाअंतर्गत असणारी ‘उत्कृष्ट बिरसा मुंडा पेसा ग्रामपंचायत योजना’ राज्याच्या आदिवासी विभागाकडून गुंडाळण्यात आली असल्याचे पेसा अभ्यासक डॉ. कुंडलिक केदारी यांनी सांगितले. Pune news

डॉ. केदारी यांनी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतीची पुरस्काराची निवड केली, अशी विचारणा केली असता अशी ही योजना गुंडाळली गेल्याचे पुढे आले. आदिवासी विकास विभागाचे ठाणे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांनी कार्यक्षेत्रातील घोडेगाव (जि. पुणे), डहाणू व शहापूर (जि. ठाणे) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या तीन वर्षातील ग्रामपंचायतीची ‘अनियमिततेची पडताळणी’ करून प्रस्तावाची निवड केली नाही, आदी बाबी विचारात घेऊन या योजनेसाठीचा अखर्चित निधी खर्च न करण्याचे आदेश एका पत्रान्वये दिले आहेत.

ही योजना राबविण्यासाठी सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी ८ लाख ८५ हजार रुपयांचा निधी नाशिक येथील आदिवासी विकास विभागास वितरित केला होता. या योजनेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी ५० हजारांचा निधी दिला होता. प्रकल्प कार्यालयाकडून त्याचा विनियोग केल्याने ही योजना चर्चेत आली. आदिवासींची आशा पालवली होती. मात्र, नुकतेच आदिवासी विकास विभागाने अखर्चित निधी खर्च न करण्याचे आदेश दिल्याने ही योजना तूर्तास तरी स्थगित झाल्याचे दिसून येत आहे.

या योजनेचा उद्देश पेसा ग्रामपंचायतीना ग्रामविकास आराखड्याबद्दल प्रशिक्षण देणे, त्याबाबतची क्षमता बांधणी करणे, आरोग्य, कुपोषण, शिक्षण, सामुहिक व्यवस्थापन, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान याबाबत करावयाच्या कामाचे आराखडे तयार करून उत्कृष्ट आराखड्याच्या अंमलबजावणीस मंजुरी देणे, यानुसार पेसा ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधी राज्यस्तरावर तीन ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाख रुपये; तर अतिरिक्त आयुक्तस्तरावर दहा ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, असे डॉ. केदारी यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख

लोकप्रिय