Tuesday, September 17, 2024
Homeजिल्हाPune: निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी मतमोजणी व्यवस्थेचा घेतला आढावा

Pune: निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी मतमोजणी व्यवस्थेचा घेतला आढावा

Pune, दि.२८ : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील मतमोजणी केंद्राची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. (Pune)

यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उप अधीक्षक प्रशांत ढोले आदी उपस्थित होते.

मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, विविध सोयी-सुविधांची उभारणी, उमेदवार यांच्या प्रतिनिधींसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.

मतमोजणीच्या अनुषंगाने करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचना अजय मोरे यांनी यावेळी दिल्या. बैठकीनंतर अजय मोरे यांनी वाहनतळाची पाहणी केली.

तत्पूर्वी शिरूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे भोसरी येथे अजय मोरे यांच्या उपस्थितीत प्रथम प्रशिक्षण घेण्यात आले.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

संबंधित लेख

लोकप्रिय