Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : नेपाळ येथील गधीमाई मंदिरातील पशू हत्या थांबवण्यासाठी पुण्यातील डॉ. कल्याण...

Pune : नेपाळ येथील गधीमाई मंदिरातील पशू हत्या थांबवण्यासाठी पुण्यातील डॉ. कल्याण गंगवाल थेट नेपाळमध्ये दाखल

८० वर्षाचा तरुण डॉ. कल्याण गंगवाल प्राणी हत्या थांबण्यासाठी थेट नेपाळमध्ये (Pune)

नेपाळमधील गधीमाई येथील निष्पाप प्राण्यांची बळी देण्याची प्रथा थांबवा – डॉ. कल्याण गंगवाल

गधीमाई देवीच्या नावावर चाललेली प्राणी हत्या कायमची बंद करावी – डॉ. कल्याण गंगवाल

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : नामांकित डॉ. कल्याण गंगवाल शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजात पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी त्यांनी व्यापक काम केले आहे. पुण्यापासून १९०० किलोमिटर अंतरावर असलेले गधीमाई देवीचे
मंदिर आहे. येवढ्या लांब जावून डॉ. गंगवाल यांनी अनेक प्राणी हत्या थांबवली असून सध्या ते नेपाळच्या सीमारेषेवर प्राणी हत्या थांबवण्यासाठी ते मोठ्या हेरीने काम करत आहेत. (Pune)

गधीमाई देवीची मंदिराच्या आवारात दर पाच वर्षांनी जगातील सर्वात मोठे प्राण्यांचे बलिदान दिले जाते. त्याठिकाणी प्राण्यांची निर्घृणपणे हत्या केली जाते.

गधीमाई देवीच्या नावावर चाललेली प्राणी हत्या कायमची बंद करावी, यासाठी डॉ. कल्याण गंगवाल अहोरात्र मेहनत घेत आहेत. नेपाळ तसेच भारतातील विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातून देखील अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात. फक्त वयाच्या ८० वर्षाचे असलेले डॉ. गंगवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या कानाोपऱ्यात जावून पशुबळी थांबण्यासाठी काम करत आहेत.

त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी पशुबळीची अनिष्ट प्रथा बंद झाल्या आहेत.

लोकांची अशी अंधश्रद्धा आहे की गधीमाई देवीला बळी दिला की, मनातील मनोकामना पूर्ण होतात तसेच नवसाला पावणारी ही देवी आहे. अशी लोकांची भावना असल्याने मोठ्या प्रमाणात प्राण्यांची बळी दिली जाते.  महिनाभर चालणाऱ्या या उत्साहात हजारो प्राण्यांच्या कत्तली केल्या जातात. २०१९ मध्ये सुमारे लाखो म्हशी, बकऱ्या, कबुतरे  इतर प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती. (Pune)

ते पुढे म्हणाले की अंदाजे ७० टक्के प्राणी हे  भारतातून सीमा ओलांडून आयात केले जातात. वाहतुकीदरम्यान त्या प्राण्यांना पुरेसे अन्न, पाणी आणि निवारा भेटत नाही. त्यांची अवैधरीत्या तस्करी केली जाते. त्या प्राण्यांना जिवंतपणीच मरणयातना दिल्या जातात.

गंगवाल म्हणाले की, आता गधीमाई देवीची यात्रा सुरू आहे. देवीसाठी बळी आणि रक्त अर्पण करण्याची अंधश्रद्धा एवढी बोकळली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. दर ५ वर्षांनी आम्ही तिकडे जात असतो. या वर्षी देखील मी आणि माझे सहकारी बिहार येथील रक्सौलला आलो आहे.

 तेथील लोकांशी तसेच सरकारशी बोलणी करून सदरील उत्सवात होणारी प्राणी हत्या थांबण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. गधीमाई येथील निष्पाप प्राण्यांची बळी देण्याची प्रथा तबोडतोब बंद करावी. अशी मागणी शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकद्वारे केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

संबंधित लेख

लोकप्रिय