Monday, December 23, 2024
Homeराज्यपालघरच्या 'या' भागातील रस्त्यांच्या कामाची होणार चौकशी, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची...

पालघरच्या ‘या’ भागातील रस्त्यांच्या कामाची होणार चौकशी, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : पालघर जिल्ह्यातील गारगांव आणि परळी विभागातील रस्त्यांच्या कामांमधील गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नवी मुंबई विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे, त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

श्रीमती मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, शांताराम मोरे, राजेश पाटील आणि सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, गारगाव व परळी येथील विकासकामांमधील गैरव्यवहाराबाबत आदिवासी विकास संघर्ष समिती आणि शिवक्रांती संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येणार आहे. 

पंचगंगा सीडस कंपनीला बियाणे विक्री बंद ठेवण्याचे आदेश – कृषीमंत्री दादाजी भुसे

या भागात आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभागाच्या २५-१५ अशा विविध योजनांमधील कामे झालेली आहेत, यातील कोणत्या कामांविषयी तक्रार आहे, त्याची चौकशी करण्यात येईल. आदिवासी, दुर्गम भागातील कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेवर झाली पाहिजेत यावर विशेष लक्ष असून या जिल्ह्यातील रस्त्यांच्या तक्रारींची माहिती घेण्यासाठी लवकरच पालघर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या जातील आणि नंतर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेकिंग : भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त; तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच होणार भरती !

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय