Tuesday, January 21, 2025

कॅन्सर पीडित महिलांच्या उपचारासाठी पुढाकार, तर आरोग्य क्षेत्रातील ‘या’ जागांसाठी होणार लवकरच भरती – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, कॅन्सर पिडित महिलांसाठी टाटा कॅन्सर इंस्टिट्यूटमध्ये मोफत तपासणी व उपचार दिले जात आहेत. विविध प्रकारच्या कँन्सर पीडित महिलांच्या उपचारासाठी राज्यशासन पुढाकाराने योजना राबवेल. 

ऑर्गन डोनेशनबाबत राज्यशासनाने टास्क फोर्स नेमलेला आहे. या टास्क फोर्सची लवकरच बैठक घेवून याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जात आहेत. काही जागांसाठी एमपीएसीकडे मागणी केली आहे. वर्ग 3 व वर्ग 4 च्या भरतीबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच रुग्णालयांच्या इमारत बांधकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

वेबसिरीजवरील अश्लिल चित्रणावर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीसांकडून कारवाई सुरु

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत देण्याबाबत बँकाना सूचना दिल्या जातील. आगामी काळात पीक कर्ज वाटप 100 टक्के पूर्ण होईल यासाठी राज्यशासन काम करेल.

या चर्चेत सदस्य श्रीमती देवयानी फरांदे, सरोज अहिरे, प्रतिभा धानोरकर, मेघना बोर्डीकर, सुलभा खोडके, मंदा म्हात्रे, सदस्य सर्वश्री रमेश कोरगांवकर, प्रकाश सोळंकी, अबू आझमी, विश्वनाथ भोईर आदींनी सहभाग घेतला.

ब्रेकिंग : भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त; तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच होणार भरती !

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २०६ जागा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles