घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील बाळहिरडा या गौणवनउपजाची, खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करत असे. परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी, बाळ हिरड्याचे भाव कमालीचे पाडले असून, प्रचंड मोठे आदिवासी बांधवांचे शोषण यातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, किसान सभेने 30 मे पासून बेमुदत धरणे आंदोलनास ट्रायबल फोरम पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी फोरमच्या वतीने जाहिर पाठिंबा व्यक्त केले आहे.
दिलीप आंबवणे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरडा उत्पादन होते.आदिवासी विकास महामंडळ हिरडा खरेदी खरेदी करत होते, त्यामुळे हक्काची खरेदी केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत होता. परंतु सध्या खरेदी बंद असल्यामुळे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. हिरड्याला कोणतीही बाजारपेठ नसल्यामुळे व्यापारी आठवडे बाजारात कमी दराने हिरडा खरेदी करतात. त्यामुळे हिरडा खरेदी महामंडळाने खरेदी करावा.
बिहारमध्ये सापडली मोठी सोन्याची खान, खाणकाम करण्यास सरकार देणार परवानगी
खरेतर आदिवासी विकास महामंडळ हे वरी, नाचणी, हिरडा, बेहडा यांच्यासह अन्य उत्पादने खरेदी करण्यासाठीच स्थापन झाले. परंतु आता आदिवासींना वाऱ्यावर सोडण्याचे काम सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळाचा उपयोग आदिवासी हितासाठी व्हावा, तालुक्याचे आमदार तसेच खासदार यांनी तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा आदिवासी जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही आंबवणे यांनी म्हटले आहे.
किसान सभेच्या बेमुदत धरणे आंदोलनास विविध गावांतून आणि संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे.
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
• आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
– राज्य शासनाने, आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून, तातडीने बाळहिरडा खरेदी करावा.
– निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते, परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी.
– प्रकल्प कार्यालयाने, महसूल विभागाशी समनव्य साधत, खाजगी क्षेत्रातील, मालकीच्या हिरडा झाडांची नोंद, सातबारा उताऱ्यावर करणेसाठी, कालबद्ध कार्यक्रम राबवावा.
– बाळहिरडा विषयक, दीर्घकालीन व हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकणारे धोरण ठरवण्यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिक्त पदांसाठी भरती, 31 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती
कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड