पाटणा : देशातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा बिहारमधील जमुई जिल्ह्याच्या भूगर्भात सापडला आहे. या ठिकाणी खाणकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे.
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (जीएसआय) माहितीनुसार, बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कर्मातिया, झाझा, सोनो या ठिकाणी भूगर्भात सोन्याचे मोठे साठे आहे. जमुईमध्ये सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे ज्यात 37.6 टन खनिज-समृद्ध धातूचा समावेश आहे, जे देशाच्या सोन्याच्या 44 टक्के आहे. जमुईतील सोन्याचे साठे भूगर्भातून बाहेर काढण्यासाठी खाणकाम करण्याबाबत बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्याच्या आत समझोता करार करणार आहे.
सोन्याच्या या प्रचंड साठ्यावर केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्यावर्षी लोकसभेत चर्चा केली होती. त्यानंतर बिहार प्रकाशझोतात आले. आता येथून सोने काढण्यासाठी बिहार सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सोन्याच्या या खाणीमुळे बिहारच्या महसुलातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एका हिंदी वृत्त संस्थेने दिले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिक्त पदांसाठी भरती, 31 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
ब्रेकिंग : केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती