Sunday, June 30, 2024
HomeआंबेगावGhodegaon : आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा – प्रमिला वाळुंज

Ghodegaon : आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा – प्रमिला वाळुंज

घोडेगाव : सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, साथी संस्था – पुणे, आदिम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव येथे ‘जन आरोग्य संवाद कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. (Ghodegaon)

या महत्वपूर्ण जन आरोग्य संवादामध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदींचा यामध्ये सहभाग होता. (Ghodegaon)

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग हा अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तर यंत्रणा, लोकप्रतिनिधीं, आदीम व साथी या संस्थांच्या एकत्रीत कृतीतून तालूक्यात लोक आरोग्य व पोषणासाठी चांगले काम ऊभे राहील ही आशा, डॉ ढेकळे व प्रितम बारभुवन यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट आणि अधिकाकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणून आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि आंबेगाव तालुक्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन वाढवणे हा या जन आरोग्य संवादाचा मुख्य उद्देश होता. (Ghodegaon)

यावेळी, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रितम बारभुवन, आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, साथी संस्थेचे शैलेश डीखळे, तृप्ती मालती, समीर गारे यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेची भूमिका व लोकसहभागाचे महत्व, आरोग्य व पोषण, जन आरोग्य समितीची भूमिका व कार्य, जन आरोग्य समिती बळकटीकरण प्रक्रिया यासह विविध विषयांवर मांडणी केली. यासोबतच उपस्थित लोकप्रतिनिधींनी आरोग्य सेवेतील औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, सामाजिक लेखा परीक्षण इत्यादी विषयक समस्या मांडल्या व यावर तालुका आरोग्य अधिकारी यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

या जन आरोग्य संवाद कार्यशाळेच्या समारोपात, साथी संस्था, आदिम संस्थेचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्यांच्या आरोग्यविषयक सूचना मांडल्या. यावेळी भविष्यातील आरोग्य उपक्रमांसाठी अभिप्राय विचारात घेतला जाईल, असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिले. या जन आरोग्य संवाद कार्यशाळेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने सर्वसामान्यांचा आरोग्य हक्क राखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शपथ धेतली. डॉ. मनीषा पंडित यांनी शपथ दिली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन समीर गारे, प्रास्ताविक डॉ.अमोल वाघमारे व शैलेश डीखळे आणि आभार सुप्रिया मते यांनी व्यक्त केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय