Sunday, December 22, 2024
Homeजिल्हामहागाई बेरोजगारी च्या विरोधात कमाल चौकात निदर्शने

महागाई बेरोजगारी च्या विरोधात कमाल चौकात निदर्शने

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

नागपूर : दिनांक 25 मे ते 31 मे पर्यंत डाव्या व लोकशाही पक्षांच्या वतीने संपूर्ण देशभर महागाई बेरोजगारी च्या विरोधात विरोध सप्ताहाचे अंतर्गत आज रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने कमाल चौकात निदर्शने करण्यात आली.

पेट्रोलियम पदार्थांवरील सर्व सेस व सरचार्ज रद्द करा,बेरोजगारी भत्त्यासाठी केंद्रीय कायदा करा, शहरी रोजगार हमी योजना सुरू करा, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, मागेल त्या शेतकऱ्याला विनाअट कृषी कर्ज द्या, सर्वांना कोरोना बूस्टर डोस मोफत द्या, आयकर न भरणाऱ्यांना मासिक  7500 रुपये मदत द्या अशा मागण्यांसह महानगरपालिका निवडणुका वार्ड पद्धतीने व बॅलेट पेपरने घ्याव्यात, प्रस्तावित पाणी दरवाढ लागू करण्यात येऊ नये, महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत अशा स्थानिक मागण्या निदर्शनाच्या दरम्यान करण्यात आल्यात यादरम्यान करण्यात येतील. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी, आजच करा अर्ज !

निदर्शकांना संबोधित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण लाटकर म्हणाले की कोरोना काळाच्या फायदा घेऊन मोदी सरकारने भांडवलदारांचा नका वाढवणारे व बेरोजगारी महागाई वाढवणारे धोरण अवलंबले आहे, अशीही टिका यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात अरुण लाटकर, एडवोकेट अनिल काळे, घनश्याम फुसे, माधव भोंडे, राजेंद्र साठे, विश्वनाथ खांडेकर, रमेश किचारे, रवींद्र साखरे रामेश्वर चरपे, विठ्ठल जुनघरे, विलास जांभूळकर, सिद्धार्थ पाटील, कांचन बोरकर, संध्या पिलावन, अर्चना नरांजे, मनीषा डंभारे, मंदाकिनी तभाने, पिंकी सवाईथुल, गीता मेश्राम, शालीनी राऊत, विजया जांभुळकर, स्नेहलता जांभूळकर, प्रीती पराते, मनोज इमाने, प्रीती मेश्राम, विजय खोबरागडे, धीरज बोरकर, ज्ञानदास गजभिये, प्रा. सुरेश पानतावणे, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, सिद्धार्थ पाटील, अरविंद गोडघाटे, शालिनी सहारे, शेख सलाम, प्रीती गाणार, मीनाक्षी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मेगा भरती : भारतीय पश्चिम रेल्वेत 3612 पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी !

रयत शिक्षण संस्था, सातारा येथे 107 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 2 जून 2022 रोजी मुलाखत


संबंधित लेख

लोकप्रिय