Thursday, September 19, 2024
Homeबॉलिवूडबॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !

बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !

 

बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी सिने इंडस्ट्रीतून येते.

टाटा आयपीएल (Tata IPL) खरंच फ्रि रिचार्ज देत आहे का? वाचा सत्य !

मुख्य म्हणजे केके यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले असून दरम्यान ते लाईव्ह कॉन्सर्टमध्ये होते. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना त्वरित CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत काळाने घाला घातला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि स्वरांच्या दुनियेतील आणखी एक तारा निखळला.

वयाच्या ५३ व्या वर्षीच केके ने जगाचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा संगीत कला क्षेत्रात शोक निर्माण झाला आहे. केके यांनी आपल्या कारकीर्दीत हम दिल दे चुके सनम सारख्या लोकप्रिय चित्रपटातील तडप तडप हे गाणे प्रेक्षकांना दिले आहे. आजही या गाण्यातील प्रत्येक शब्द प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारा आहे. याशिवाय हम रहे या ना रहे कल, मेरी जा बेपनाह, सच केह रहा है दिवाना अशी गाणी देणारा कलाकार इंडस्ट्रीने गमावणे ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात 517 पदांसाठी भरती, 1 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय