मुंबई : राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्या बाबत केंद्र सरकारच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाही. या क्षेत्रात कृषी उत्पादने संबंधित शेतकरी घेऊ शकतात. मात्र या क्षेत्राचा अन्य वापर करता येत नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य ॲड.राहुल कुल यांनी ग्रोमोअर व इतर विविध योजनेअंतर्गत झुडपी वने व राखीव वनक्षेत्रे यांच्या प्रस्तावासाठी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते.
मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, या संदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले तर वनविभागामार्फत संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले जातील. या संदर्भात केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार वनजमिनीचा वापर वनेतर कामासाठी करावयाचा असल्यास त्याकामांसाठी त्या जमीनीशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही हे सिद्ध करावे लागते. त्यामुळे वनजमिनी म्हणून घोषीत केलेल्या जमीनीचा वनेतर वापर करता येत नाही.
या चर्चेत सदस्य संजय गायकवाड, देवराव होडी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर
ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज