नवी दिल्ली : प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची वायनाड मधून लोकसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच लोकसभेमध्ये जोरदार भाषण केले. त्यांनी दिलेल्या भाषणात केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी संविधानावर चर्चा करताना मोदी सरकारला घेरले आणि अनेक मुद्द्यांवर तीव्र टीका केली.
प्रियंका गांधी म्हणाल्या, “पूर्वीचा राजा वेषांतर करून जनतेमध्ये जात होता, आपल्या राज्य कारभाराबाबत तो लोकांची मते जाणून घेत असे. पण आजचा राजा वेश बदलतो, तो त्याचा शौक आहे, पण ते जनतेच्या भावना समजून घेत नाहीत. प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर आरोप करत सांगितले की, देशात भयमुक्त वातावरण नाही, “देशाच्या इतिहासात, ब्रिटिश साम्राज्याच्या काळात भीतीचे वातावरण होते, आणि आज त्याच गोष्टींचा सामना आम्ही करीत आहोत.” त्यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्ष विरोधकांना मुक्त विचारांची मुभा दिली नाही, तर त्यांना तुरुंगात टाकण्यात येत आहे.
प्रियंका गांधींनी यांनी, “सध्याचे सरकार विशिष्ठ उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे, देशाची सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत. आणि सामान्य जनता दररोजच्या कष्टात संघर्ष करत आहे.”
सरकारच्या कामकाजावर ताशेरे मारत प्रियंका गांधी म्हणाल्या, बेरोजगारी, महागाई आणि कृषी मूल्यांच्या कायद्यांसारख्या समस्यांवर सरकार कोणती उपाययोजना करत आहे. उद्योगपतिंच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत आहेत आणि शेतकऱ्यांना कुठलाही फायदा मिळत नाही.
प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) अखेरच्या भागात संविधानाचे महत्व सांगितले. त्या म्हणाल्या की, “हा देश साहस आणि संघर्षावर उभा आहे. संविधान आम्हाला एकतेचा आणि प्रेमाचा संदेश देतो. भारतीय राज्यघटना हे आरएसएसचे संविधान नाही. ते केवळ कागदपत्र नाही. न्याय आणि आशेची ती ज्योत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार दिला आहे. ही राज्यघटना न्यायाची हमी देते.
Priyanka Gandhi
हे ही वाचा :
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास
Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर