Saturday, December 21, 2024
Homeजुन्नरकिल्ले शिवनेरी मार्गावरील विजेचा खांब धोकादायक अवस्थेत

किल्ले शिवनेरी मार्गावरील विजेचा खांब धोकादायक अवस्थेत

जुन्नर : येत्या १९ तारखेला होणाऱ्या शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर (ता. जुन्नर) राज्यभरातून लाखो शिवभक्त येत असतात. या मार्गावरील दत्तमंदिराजवळ असलेला विजेचा एक खांब गेल्या तीन महिन्यांपासून धोकादायक आणि कलंडलेल्या अवस्थेत उभा आहे. 

सदर खांब दुरुस्तीबाबत बारवचे सरपंच संतोष केदारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वीज विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कोणतेही काम करण्यात आलेले नाही. दरम्यान शिवजयंतीच्या आढावा बैठकीत याबाबत आमदार अतुल बेनके यांनी संबंधित विभागाला याबाबत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. 

मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन, किसान सभा, मजूर एकत्रित विशेष बैठक संपन्न

गडाकडे जाणाऱ्या या मार्गावर अजूनही काही खांब धोकादायक अवस्थेत उभे आहेत. हे काम करत करताना संबंधित ठेकेदाराने खांब आणि रस्ता यामध्ये योग्य अंतर ठेवलेले नसून काही ठिकाणी हे पथदिवे रस्त्याच्या अगदी जवळ उभे आहेत. तसेच या ठिकाणी दोन पथदिव्यांच्या मधील अंतर अतिशय कमी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश परदेशी यांनी केला आहे. 

केवळ आलेला निधी संपवायचा या उद्देशाने अधिकारी चुकीचे इस्टीमेट बनवतात. ठेकेदार, अधिकारी आणि काही प्रसंगी नेते यांच्या सोयीने कामांचे स्वरूप ठरत असते, असे परदेशी म्हणाले. 

जुन्नर : हिरडा कारखान्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !

२०१९ साली किल्ले परिसरात सुमारे १ कोटींच्या निधीतून हे पथदिवे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत लावण्यात आले होते. मात्र आता या पथदिव्यांची दुरुस्ती व देखभाल कोणी करायची तसेच विजदेयके कोणी अदा करायची, याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. या पथदिव्यांचे लाखो रुपयांचे बिल अद्याप थकीत आहे. सध्या हे बिल बारव व कुसुर ग्रामपंचायतीच्या नावाने निघत असून या छोट्या ग्रामपंचायती ही बिले भरण्यास असमर्थता दाखवत आहेत. 

याबाबत या ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की या पथदिव्यांच्या वीज बिलाची रक्कम किल्ले शिवनेरी विकास परिसर निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज विभागाने सांगितले होते. या मार्गावरूनच शिवजयंतीला लाखो शिवभक्त तसेच अनेक मंत्रीगण गडावर मानवंदना देण्यासाठी येत असतात. सदर खांब सध्या एका झाडाच्या फांदीचा आधार घेऊन उभा आहे.

जुन्नर : राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय