Home राज्य Vijay Shivatare : विजय शिवतारे यांच्या उमेदवारीने बारामतीतील राजकारण तापले, शिवतारे दोन्ही...

Vijay Shivatare : विजय शिवतारे यांच्या उमेदवारीने बारामतीतील राजकारण तापले, शिवतारे दोन्ही पवारांना पाडणार ?

Politics in Baramati heated up with the candidature of Vijay Shivtare, will Shivtare topple both the Pawars?

Vijay Shivatare : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. विजय शिवतारे यांच्या या घोषणेमुळे बारामती मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

बारामती लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), यांच्या सोबतच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता ही लढत होणार असल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) म्हणाले, मी महायुतीच्या विरोधात नाही, तर बारामतीच्या राजघराण्याच्या विरोधात आहे. बारामतीतील जनता पवार घराण्याला कंटाळली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना मतदान करायचे नाही. पवारांच्या विरोधात कुणाला तरी हिंमत दाखवावी लागेल. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असून या जागेवर सुप्रिया सुळे या मविआच्या उमेदवार आहेत हे विशेष. शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

दरम्यान, शिवतारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माघार घ्या, असे सांगितले तरी देखील मी लोकांचे ऐकेल असे म्हणत बारामती ही कोणाची मालमत्ता नाही. तसेच मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

Exit mobile version