Monday, December 23, 2024
Homeनोकरीकविता : क्षितिज - संग्राम सलगर

कविता : क्षितिज – संग्राम सलगर

पाहतो आकाशाला 

वाटते टेकले भूमीला 

भास होतो मनाला 

अजूनही हळवं मन घेतय शोध

विज्ञानाच शिकवतय बोध 

पाहता त्याकडे अजूनही लागते वेध

अनोखी त्याची किमया 

आढळून येते पृथ्वी आणि अवकाशाची माया 

पाहतो तेव्हा प्रत्येक समया 

क्षितीजच देते जगण्याची आशा 

दूर करते निरागस मनाचा निराशा 

खरोखरच अनोखीच आहे त्याची नशा 

नटवते आख्या सृष्टीला 

प्रेरित करते सर्वांला

क्षितीजच भासते प्रत्येक मनाला 

✒️ संग्राम संतोष सलगर, सोलापूर 


संबंधित लेख

लोकप्रिय