पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून क्रीडा संकुलासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. शहरात अनेक प्रभागात क्रीडा संकुले अबाधित राखण्यासाठी महापालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा अनुभव येत आहे. Plight of Swami Vivekananda Sports Complex

सेक्टर क्र.१८ हद्दीतील जिजामाता पार्क येथील अनेक रहिवासी भागांत ‘स्वामी विवेकानंद क्रीडांगण’ येथे सर्वत्र अस्वच्छता, झाडी-झुडपे, गवत वाढलेले व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले अशीच स्थिती शहरातील अन्य रहिवासी भागांची असल्याने स्थापत्य विभाग व संबंधित अधिकार्यांविरोधात नागरिकांत मोठ्या प्रमाणावर रोष वाढत आहे.
क्रीडा संकुल भाडेतत्त्वावर देण्याचे कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
शहरातील अनेक क्रीडा संकुले किंवा त्यातील काही भाग कंत्राटी पद्धतीने चालविण्यात दिले आहेत संबंधित कंत्राटदार अवाजवी भाडे आकारून खेळाडूंचा आर्थिक शोषण करतात.
पेठ क्र.१८ येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात काही भाग बॅडमिंटन कोर्ट कंत्राटी पद्धतीने दिले असून अद्याप चालू झालेला नाही. क्रीडांगणाच्या मधोमध क्रिकेट खेळण्यासाठी सिमेंटचा पीच तयार केल्यामुळे इतर खेळाडूंना त्याचा त्रास होत आहे. क्रीडांगणाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता वेगवेगळ्या आस्थापनाला काही भाग भाडेतत्त्वावर दिली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या सुविधांचा वापर करता येत नाही.

क्रीडांगणामध्ये सर्वत्र झाडेझुडपे वाढली आहेत, राडाराडा पडलेला आहे. काही एक महिन्यापासून स्वच्छता केली नाही. अस्वच्छ दुर्गंधीयुक्त क्रीडांगणामध्येच व्यायाम करणारे नागरिक, उद्याचे भारताचे राष्ट्रीय खेळाडू याच ठिकाणी सराव करताना दिसतात.
याबाबत महात्मा फुलेंनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले म्हणाले की, गेले कित्येक दिवसापासून पिण्याचा पाण्याचा पाईपलाईन लिकेज असून प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. अशा अनेक समस्याने ग्रासलेला स्वामी विवेकानंद क्रीडांगण नेमकं कोणत्या उद्देशाने बांधला आहे त्याचा एकदा महानगरपालिकेने चिंतन केली पाहिजे. ज्यांच्या संकल्पनेतून हे क्रीडांगण उभे राहिले आहे, किमान त्यांनी तरी गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यक आहे.

निष्काळजीपणे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याकडून फारशी अपेक्षा नाही, येथील क्रीडासंकुला मध्ये किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे. आहे त्या स्थितीत म्हणजे स्वच्छ व सुंदर दिसेल यासाठी काही प्रयत्न प्रशासनाने केले पाहिजेत.