पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई – श्रम पोर्टल सुरू केले आहे. चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरातील असुरक्षित, असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान दि.13 जानेवारी पासून सुरू करत आहोत, दोन लाखाचा मोफत विमा आणि अपघाती अपंगत्व एक लाख सह भविष्यातील इतर शासकीय योजनांचे फायदे कामगारांना मिळतील, त्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहिती नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी दिली आहे.
येथील जनसंपर्क कार्यालयाचे समन्वयक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी आवाहन केले आहे की, चिखली, जाधववाडी, मोशी प्रभागातील घरेलू कामगार, टेलरिंग, मासे विक्रेते, पथारी हातगाडी, वीटभट्टी मजूर, भंगार, कचरा वेचक, घरगुती कामगार, दूधवाला, ट्रक चालक, रिक्षाचालक ई श्रमिकांनी कार्यालयाशी संपर्क करावा.
– क्रांतिकुमार कडुलकर
हेही वाचा ! रोजगार वाढल्याचे सांगून केंद्राने कष्टकरी कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले – काशिनाथ नखाते
हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा
हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर