Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात जागतिक योग दिन साजरा!

PCMC : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात जागतिक योग दिन साजरा!

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : योगाभ्यास ही सातत्यपूर्ण रितीने, दीर्घकाळपर्यंत निरंतर करण्याची साधना असून, ती जेव्हा आत्यंतिक आंतरिक तळमळीने, रसरसत्या उर्जेसह, आदरपूर्वक आणि समर्पित भावनेने अनुसरली जाते तेव्हाच ती चित्तात दृढमूल होते. असे योगगुरू अर्चना सोनार यांनी सांगितले. PCMC

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात व स्वयंस्फुर्तीने महिला भगिनीसह अबाल वृद्धांनी सहभाग घेवून साजरा करण्यात आला. यात स्थानिक नागरिक, मंडळाचे सदस्य, सामाजिक क्षेत्रांतील अनेकांनी योगा करण्यास सहभाग घेतला. pcmc

यावेळी योग योगशिक्षक अर्चना सोनार (योगगुरु) यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगा, प्राणायामावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करावी. ध्यान, धारणेला प्राधान्यक्रम द्यावा, असा सल्ला योगशिक्षकांकडून या कार्यक्रमात आवर्जून देण्यात आला. pcmc

भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी वैदेही पटवर्धन, राजेंद्र देशपांडे, विकास देशपांडे, प्रा. ईश्वर सोनार, गीता खनकर, ज्योती कानेटकर, करुणा मिस्त्री , दर्शना शेट्टी, कल्पना पाटील व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षदा पोरे यांनी यांनी सूत्रसंचालन केले व सर्व योगा साधकांचे आभार मानले प्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

संबंधित लेख

लोकप्रिय