पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पूरूषांनी वाजत गाजत सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली, महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था 2016 पासून ही अभिनव वटसावित्री पौर्णिमा साजरी करत आहे. यावेळी सात जन्म हिच पत्नी मिळावी, यासाठी सात प्रदक्षिणा घालून वट पूजन केले. PCMC
विकास कुचेकर म्हणाले की महीलांनी वटवृक्षाची फांद्या न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आव्हान केले.
अरूण पवार म्हणाले कि, कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले, सजीव सृष्टीला श्वास देणाऱ्या देशी वृक्षांचे संगोपन करूया.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, उच्च शिक्षित स्त्री व पुरुषामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे, अशा समानतेच्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल आणि नऊ वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा आयोजकाचे त्यांनी कौतुक केले. PCMC
शहराध्यक्ष आण्णा जोगदंड (Anna JOGDAND (PCMC) म्हणाले की कायद्याने आता स्त्री पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. तरीही त्या वट वृक्षाला सात फेरे प्रदक्षिणा घालतात. मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे,म्हणून पूजा करावी.
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या की, आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन आमच्यासाठी दिर्घ आयुष्य मागीतले यामुळे खूपच आनंद झाला आहे.
शंकर नाणेकर म्हणाले कि आजही शासन म्हंणत कि स्त्री पुरुष समान आहेत व शासनाच्याच रोजगार हमी योजने मध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा कमी रोजगार दिला जातो आणि तसेच संसदेत सुद्धा 33 टक्के आरक्षण मिळत नाही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढया संसदेत महिला खासदार आहेत म्हणजेच शासनाचे फक्त बोलायचे एक आणि करायचे असं सरकारच काम चालू आहे असं मला वाटते.
संजना करंजावणे म्हणाल्या कि मला खंत व्यक्त कराविशी वाटते कि, नुकतेच जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यू इ एफ) कडून जारी करण्यात आलेल्या जागतिक लिंग आधारित निर्देशांकांत (ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स) नुसार 146 देशाच्या रँकिंग मध्ये 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत 127 वा क्रमांक आहे.
वृक्ष मित्र अरुण पवार यांनी पर्यावरण संरक्षण आणि सर्वधनाची व प्लास्टिक न वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कामगार कल्याण उपायुक्त मनोज पाटील, पिंपरी चिंचवड महीला अध्यक्षा मिना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जेष्ट प्रबोधनकार शारदा मुंडे, गुणवंत कामगार काळुराम लांडगे, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, अमोल लोंढे, विकास शहाणे, सुरेश कंक, प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने,आरोग्य मुकादम विजय कांबळे, लक्ष्मण जोगदंड, जाई जोगदंड, रमेश थोरात, प्रदिप बोरसे, जालिंदर दाते, शंकर नानेकर, शामराव सरकाळे, प्रकाश सावंत, सचिन करंजावणे, इंद्रजित चव्हाण, सारंगी करंजावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत
AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर