Sunday, January 12, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्यासह 50 हजार उद्योजकांनी दिली प्लास्टो...

PCMC : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्यासह 50 हजार उद्योजकांनी दिली प्लास्टो प्रदर्शनाला भेट

पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) – असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सच्या वतीने चार दिवस मोशी येथे भरविण्यात आलेल्या प्लास्टो 2025 प्रदर्शनाला केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दि. 11 रोजी तर महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि 10 रोजी सदिच्छा भेट दिली.या चार दिवसात सुमारे 50 हजार उद्योजकांनी भेट देवून नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. (PCMC)

यावेळी श्री मोहोळ आणि श्री पाटील यांनी प्रदर्शनात सहभागी झालेले उद्योजक व अभ्यागतासोबत चर्चा केली. प्लास्टिक उद्योगाचे भरवलेले प्रदर्शन पाहुन आयोजकांचे कौतुक केले.

यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सचे अध्यक्ष अनिल नाईक, प्लास्टो 2025 चे अध्यक्ष अजय झोड, संयुक्त अध्यक्ष निलेश पटेल, सचिव समीर कोठारी, उपाध्यक्ष एन शंकरामन, खजिनदार प्रणव बेल्हेकर, ऍडमिन आनंद कुंभोजकर, सदस्य राज मिर्जे, गोपाळ ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संघटनेच्या वतीने ना मोहोळ आणि ना. पाटील यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

दि. 10 रोजी संध्याकाळी पिंपळे सौदागर येथे उद्योजकांसाठी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कच्चा माल पुरवठादार विभागात के लॉन टेक्नो पॉलिमर कंपनीला मिलेक्रॉन इंडिया कंपनीला उत्पादन विभागातून तर बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टसाठी गुलमोहर पॅक टेक कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

PCMC

यावेळी अभिनेता प्रवीण तरडे, अध्यक्ष अनिल नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील 250 कंपन्यांनी आपले उत्पादने सादर केले होते. यामुळे प्लास्टिक साठी कच्चा माल पुरवठा उद्योगवाढ , मेक इन इंडिया, नवीन स्टार्ट अप साठी उपयुक्त ठरणार आहे.अशी माहिती अध्यक्ष अनिल नाईक यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय