Monday, January 13, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC: अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे पिंपळे सौदागर येथे आयोजन

PCMC: अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे पिंपळे सौदागर येथे आयोजन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ यांनी अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन केले होते. (PCMC)

शहरांचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यामुळे नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. अश्या सोसायट्यांमध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या आयुष्याची पुंजी लावून घर विकत घेतात परंतु घर घेतेवेळी विकासकांनी दिलेली विविध आश्वासने व गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर सुनियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सोसायटीला सिव्हील कोर्टात दावा करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.

ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असल्या कारणाने त्याचा तक्रार करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो म्हणून सहकार दरबारच्या माध्यमातून अश्या समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन केले जाते.

या अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन हॉटेल शिवार गार्डन, पिंपळे सौदागर येथे करण्यात आलेले होते. या मेळाव्यायासाठी शहरातील विविध भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (PCMC)

यावेळी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी, पुणे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी, ॲड. कणाद लहाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मा.विरोधीपक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट

संबंधित लेख

लोकप्रिय