Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघने केला जागतिक मानव अधिकार...

PCMC : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघने केला जागतिक मानव अधिकार दिवस साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – १० डिसेंबर हा जागतिक मानव अधिकार दिवस सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेने पिंपरी चिंचवड येथे साजरा केला. सदर कार्यक्रम प्रसंगी मानव अधिकार काय आहेत, ते कसे वापरले पाहिजेत, संस्थेने केलेली कामे यावर चर्चा करण्यात आली तर संस्थेला नवीन जोडले गेलेले सदस्य अभिजित अगवणे व आशिष कदम यांचे संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे यांनी स्वागत केले. (PCMC)

या प्रसंगी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके उपस्थित होते. जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करणे ही आजच्या काळाची गरज बनलेली असून समाजामध्ये मानव अधिकारांची जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. आजच्या या काळात होत असलेले महिला आणि मुलींवरील अत्याचार पाहता, अन्यायाला वाचा फोडणे आणि स्त्री सशक्तीकरण करणे गरज बनलेली आहे, तर सामाजिक संस्थां, समाज सेवकांनी आमच्या संस्थेबरोबर काम करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी केले. (PCMC)

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मानव अधिकार हे सर्वांना माहिती असायला हवेत तर देशाच्या हितासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था नेहमीच काम करण्यात अग्रेसर असेल अशी माहिती संस्थेचे पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी एकमताने दिली.

जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे जिल्हा सदस्यांना फोन वरून शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था नेहमीच मानव अधिकार जण जागृती करत असताना महिला, मुलींवर होणारे अत्याचार कमी व्हावेत यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवत असते.समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार कमी करणे, माणसांनी माणसांशी माणसासारखे वागणे यासाठी नेहमीच संस्था काम करत असते.

समाजातील प्रत्येक घटकाला अधिकार आहेत आणि ते त्यांचा हक्क आहे,तो सर्वांना सारखा मिळायला हवा म्हणून संस्था वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत असते अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी दिली.

जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त माहिती

मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याशी संबंधित बाबींसाठी भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 आहे. या कायद्यानुसार, मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवी हक्क आयोग आणि मानवाधिकार न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
मानवी हक्कांच्या काही प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत. (PCMC)

जीवनाधिकार, यातनांपासून मुक्तता, गुलामगिरीपासून मुक्तता, कोर्ट सुनावणीचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य.

मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी:

मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवी हक्क आयोग आणि मानवाधिकार न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.

मानवी हक्कांचे मुख्य उद्दिष्ट शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे हे आहे. मानवी हक्कांचा हक्क सर्व व्यक्तींना आहे,

महाराष्ट्रात राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 15 जानेवारी 2000 रोजी करण्यात आली होती. या आयोगावर एक अध्यक्ष आणि दोन सदस्य आहेत.

खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.

जीवनाधिकार (Right to life)
यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)

संबंधित लेख

लोकप्रिय