पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व क्रिडा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२४ चे आयोजन स्केटिंग मैदान, डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल, मासुळकर कॉलनी येथे करण्यात आले आहे. (PCMC)
या स्पर्धेचे उद्घाटन क्रिडा अधिकारी अनिता केदारी व पंचप्रमुख विवेक भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभावेळी स्पर्धाप्रमुख व क्रिडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोणे, हरिभाऊ साबळे, क्रिडाशिक्षक दादाभाऊ होलगुंडे, ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक शेखर कुलकर्णी, राजेंद्र महाजन, क्रिडा पर्यवेक्षक बाळाराम शिंदे उपस्थित होते.
जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुमारे १८४९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ६२७ मुलींचा तर १२२२ मुलांचा सहभाग आहे. तसेच या स्पर्धेसाठी चीफ ऑरबीटर श्रद्धा विचवेकर, विवेक भागवत, सदाशिव गोडसे, विकास देशपांडे, शुभम चौधरी, अभिजित पाध्ये, रामभाऊ चौधरी, मधूकर पानदरे, अभय घनवट, मानसी भागवत हे पंच म्हणून काम पाहत आहेत. (PCMC)
याव्यतिरिक्त, स्पर्धेच्या नियोजनसाठी बाळू काळभोर, युवराज गवारी, नितीन चावरीया, गणेश लांडगे, विलास लांडे, भानुदास बलकवडे यांनी सहकार्य केले.
PCMC : १४ वर्षाखालील जिल्हा क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा
संबंधित लेख