Sunday, July 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : बोपखेल येथील पुल वाहतुकीसाठी होणार खुला होणार

PCMC : बोपखेल येथील पुल वाहतुकीसाठी होणार खुला होणार

नागरिक व विद्यार्थ्यांची सोय होणार, वाहतूक अंतर व वेळ होणार कमी PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : बोपखेल गावासाठी दापोडी येथुन सीएमई हद्दीतुन जाणारा रस्ता मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दि.१३/०५/२०१५ रोजी बंद करणेत आल्या मुळे बोपखेल गावातील रहिवाश्यांना दापोडीकडे जाण्याकरीता पुर्वी लागणारे २ कि.मी. चे अंतर रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १६.०० कि.मी. झाले आहे. त्यामुळे बोपखेल येथील नागरीकांना पुणे कडे ये-जा करणेसाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे १५ ते १६ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत होता. PCMC

त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी व कामगारांची मोठी गैरसोय होत होती. दि.२०/०७/२०१९ रोजी सदर ठिकाणी पुल बांधणेकरीता निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार मे.टी.अँड टी. इन्फ्रा लि. यांना कामाचे आदेश देणेत आले. pcmc

निविदा रक्कम : र.रु.४५,४६,३९.१२२/-

निविदा स्विकृत रक्कम : र.रु.५३,५३,३७,५९४/- (Royalty + Material Testing)

ठेकेदाराचे नाव : मे.टी अँड टी इन्फ्रा लि.

सल्लागाराचे नाव : मे. स्तुप कन्सल्टंट प्रा.लि.

आदेशाची-तारीख : दि.२०/०७/२०१९

कामाचीमुदत : २४ महिने (मुदतवाढ दि.१७/११/२०२४ पर्यंत)

पुलाची लांबी- १८५६.०० मी.

पुलाची रुंदी- ८.४० मी.

पोहचरस्त्यांची लांबी

बोपखेल बाजु- ५८.०० मी.

खडकी बाजु- २६२.०० मी.

असे बांधकाम करणेत आले असुन आज अखेर सदर पुलाचे काम ९८% पुर्ण झाले असुन ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करणेचे नियोजन आहे.

सदर पुलाच्या जागेमध्ये संरक्षण विभागाच्या आस्थापना व वसाहतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या येत असलेल्या महापारेषण विभागाच्या अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनो-या मुळे कामास अडथळा निर्माण झाला होता. सद्यस्थितीत सदर उच्च दाब विद्युत वाहिन्या व मनोरे दि.१८/०५/२०२४ रोजी स्थलांतरीत करणेत आलेले असुन अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे पूर्णत्वाकडे आहेत.

या प्रकल्पामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना २.९ कि.मी. अंतरावर खडकी कॅन्टोमेंट भागातुन पिंपरी चिंचवड व पुणे शहराकडे ये-जा करणेस सुलभ होणार आहे. परिणामी नागरिकांचा वेळ व इंधन खर्च वाचणार असुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल.

“पुलाचे काम पूर्णत्वाकडे आहे लवकरच वाहतुकीसाठी खुला करणेत येणार आहे. संरक्षण खात्याशी व वाहतूक पोलिस अधिकारी यांचेशी समन्वय साधून नियोजन करणेत येत आहे. बोपखेल येथील नागरिक व कामगार यांची सोय होणार तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे याचा आनंद आहे.”

प्रमोद ओंभासे सह शहर अभियंता, प्रकल्प विभाग

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय