Saturday, July 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजनासाठी विशेष सभा

PCMC : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजनासाठी विशेष सभा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट २०२४ पासून शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले असून या स्पर्धेच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन शुक्रवार दि. ५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले आहे. pcmc

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ साठी मागील वर्षीप्रमाणेच सर्व खेळांच्या प्रवेशिका ऑनलाईन स्विकारल्या जाणार आहेत. खेळाडूंची नोंदणी, प्रवेशिका नोंदणी याबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले जाणार असून स्पर्धेच्या आयोजन स्थळाबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.

महापालिका शाळांसोबत खाजगी शाळा (संस्था) विविध खेळांच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास इच्छुक असल्यास त्याबाबतची पत्रेही आयोजित सभेत स्विकारली जाणार आहेत.

शासनाने प्रत्येक शाळेस किमान २ सांघिक खेळामध्ये व एका वैयक्तिक खेळामध्ये सहभागी होण्याचे सक्तीचे केले असल्यामुळे, शाळा प्रमुखांनी आपल्या शाळेमधील जास्तीत जास्त संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करावेत. pcmc

तसेच महापालिका हद्दीतील सर्व महापालिका आणि खाजगी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक, संगणक ऑपरेटर यांनी मंगळवार ५ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ नियोजन तसेच आयोजनासंदर्भातील बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन क्रिडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय