Saturday, July 6, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी; विद्यार्थी गुणगौरव सोहळा

PCMC : श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी; विद्यार्थी गुणगौरव सोहळा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नवी सांगवी कारवार समाज सभाग्रहामध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या 65 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. PCMC

यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात मांडणारे उत्कृष्ट रचनाकार, गायक म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले ज्यांनी संगीतनाटके, संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले आणि त्यांनी भूपाळी गान, आरती गान, लोकरंग, “माझे एक  ऐक  देवा “अशी महानाटके यांनी सादर केली आहे असे होनराजे मावळे यांना शिवाजी महाराजांची मूर्ती संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. PCMC

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने म्हणाले की, आमची संस्था आम्हाला समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून आम्ही गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थी गुणगौरव, दुष्काळग्रस्तांना मदत, वारकऱ्यांना जेवण वाटप, ज्ञानेश्वरी वाटप, अंध अपंग मुलांना शालेय वस्तूचे वाटप, जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सतीश मदने यांनी यावेळी सांगितले.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड म्हणाले की आपल्या संस्थेला मिळालेल्या नफ्यातून समाजासाठी काम करणारे पिंपळे गुरव, सांगवी परीसरातील उत्कृष्ट संस्था आहे असे सतत समाज हितासाठी काम करणारी श्रेयस पतसंस्था म्हणून नावलौकिक असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने, सचिव योगेश देशमुख, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर खजिनदार सुधीर घाडगे, संतोष टकले, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड , उत्कृष्ट रचनाकार होनराजे मावळे, हेमंत राजे मावळे व्यवस्थापिका सारिका कुलकर्णी, प्रकाश बंडेवार, मुरलीधर दळवी अनेक सामाजिक कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन सौरभ क्षीरसागर ,सागर यनपुरे यांनी केली तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या व्यवस्थापिका सारिका कुलकर्णी यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय