Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, शिवतेज नगर;(SSC/HSC) गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

PCMC : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, शिवतेज नगर;(SSC/HSC) गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, शिवतेज नगर, चिंचवड वतीने एस. एस. सी. व एच. एस. सी. मार्च 2024 मध्ये 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. (pcmc)

प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी तथा एस. एस. सी. बोर्डाचे सहा. आयुक्त अनिल गुंजाळ व प्रसिध्द निवेदक तथा व्याख्याते राजेंद्र घावटे सर उपस्थित होते. अनिल गुंजाळ यांनी आपल्या विनोदी, मर्मभेदी व ओघवत्या शैलीत विद्यार्थी व पालकांना अतिशय करिअर मार्गदर्शन केले. प्रसिद्ध व्याख्याते राजेंद्र घावटे गुरूंचे जीवनातील महत्व विशद केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष हरी नारायण शेळके सर होते. (pcmc)


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका रिकामे यांनी केले. कार्यक्रमाला कल्याण वाणी, पप्पू लोढा, राजू गुणवंत व इतर मान्यवर तसेच परिसरातील नागरीक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमांचे नियोजन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. (pcmc)

कार्यक्रमाचे संयोजन अंजली देव, क्षमा काळे, नीलिमा भंगाले, गीता पाटील, सविता राणे, प्रदीप राणे, जगन्नाथ पाटील, केतकी वझे, छाया महाजन मेघराज बागी सह श्री स्वामी समर्थ युवामंच, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरीक यांनी केले. (pcmc)

विद्यार्थ्याना प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरीक व विद्यार्थ्यांनी संयोजकांचे आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय