Friday, July 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'लाडकी बहीण' साठी एक खिडकी योजना राबवावी - निलेश तरस

PCMC : ‘लाडकी बहीण’ साठी एक खिडकी योजना राबवावी – निलेश तरस

चिंचवड मध्ये शिंदे सरकारचे अभिनंदन व शिवसेनेचा आनंद उत्सव pcmc

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवत ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना वेळेत मिळावा यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्फत आपण करणार आहोत असे शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस यांनी सांगितले. pcmc

शिंदे सरकारने एक जुलैपासून राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अनुदान व वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.

या निमित्त शिंदे सरकारचे अभिनंदन करीत चापेकर चौक, चिंचवड येथे शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख शैलजा पाचपुते, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, दिलीप पांढरकर, खंडूशेठ चिंचवडे, महिला शहर संघटिका सरिता साने, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शहर युवा प्रमुख प्रदीप पवार, उपजिल्हा युवा प्रमुख हर्षवर्धन पांढरकर, सायली साळवी, प्रशांत कडलग, दिलीप कुसाळकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, महेश कलाल, नारायण लांडगे, मुकुंद ओव्हाळ, ऋतू कांबळे, सुवर्णा कुटे, जय साने, सोनाली वाल्हेकर, दुर्गा पांढरकर, अश्विनी बागुल, उज्वला तोमर, श्वेता कापसे, मीनल भालेराव, पौर्णिमा अमराव, सुनीता शर्मा, शारदा वाघमोडे, सुवर्णा तडसरे, रंजना सोनवणे, शकुंतला जाधव, संगीता परदेशी, चक्रवर्ती वर्मा, प्रयाग बहिरट, सय्यद पटेल, सागर पुंडे, रुपेश चांदेरे आदी उपस्थित होते.

शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस म्हणाले की, शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावेत.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर म्हणाले की, सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये नाव लिहिताना प्रत्येकाने आपल्या नावापुढे आईचे नाव लिहावे, असा कायदा करून शिंदे सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. PCMC

आता लाडकी बहीण योजना म्हणजे दिवाळीपूर्वीच महिलांना दिलेली भाऊबीज आहे. तसेच महिलांना वर्षभरात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असेही आवाहन दिलीप पांढरकर यांनी केले या योजनेच्या लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असेही पांढरकर यांनी सांगितले.

युवतीसेना शहर प्रमुख रितू कांबळे यांनी आभार व्यक्त केले

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय