Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिघी येथे लिंगायत समाजासाठी आणखी एका दफनभूमीस मंजुरी

PCMC : दिघी येथे लिंगायत समाजासाठी आणखी एका दफनभूमीस मंजुरी

माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मागणीस यश PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरांमध्ये लिंगायत समाजासाठी दिघी येथे 24 गुंठे क्षेत्र दफन-भूमीसाठी देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. pcmc

पिंपरी चिंचवड शहरामध्ये लिंगायत धर्मियांसाठी मोरवाडी येथे एकच दफनभूमी असल्याने ती अपुरी पडत होती. त्यामुळे समाजाला पिंपरी चिंचवड शहरांमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी मा.आयुक्त व मा.मुख्यमंत्री यांचेकडे अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी मागणी केली होती.

या चार जागांपैकी दिघी या ठिकाणी माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने 24 गुंठे जागा दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली आहे. (Land sanctioned for burial ground for Lingayat community)

शहरात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे, त्यामुळे दिघी, डुडुळगाव, चऱ्होली, भोसरी, बोपखेल इत्यादी भागात राहणाऱ्या लिंगायत समाजाच्या बांधवांनी दफनविधीसाठी या दफनभूमीचा वापर करावा, असे आवाहन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे. तसेंच सदर दफनभूमीचा स्मशान दाखला देण्यासाठी प्रशासनाकडून संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी 9422005330 येथे संपर्क करावा, असे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

संबंधित लेख

लोकप्रिय