Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिखली कुदळवाडी भंगार दुकानाचे सेफ्टी ऑडिट करून स्वतंत्र भंगार पार्क...

PCMC : चिखली कुदळवाडी भंगार दुकानाचे सेफ्टी ऑडिट करून स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी – सचिन चिखले (MNS)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिखली कुदळवाडी सह लगतच्या औद्योगिक अस्थापनातील स्क्रॅप चिखली कुदळवाडी परिसरातील हजारो दुकानांमध्ये साठवले जाते. भंगार विलगिकरण, पॅकिंग करणारे शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत असतात. (PCMC)

याठिकाणी गेल्या अनेक वर्षात मोठ्या आगी लागून आसपासच्या नागरी रहिवाशी परीसरात मोठ्या आगी लागल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर बकाल, पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे. येथे आग प्रतिबंधक सूचना आणि नियमावलीचे पालन केले जात नाही, त्यामुळे येथे वारंवार मोठ्या प्रमाणात आगी लागून धोकादायक परिस्थिती आणि प्रदूषण निर्माण होत आहे.

निवासी क्षेत्रात असलेल्या या दुकानांना स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखली यांनी केली आहे.

कुदळवाडी या ठिकाणी भंगार गोदामाला काल आग लागली होती, आज देखील त्या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात आग चालूच आहे त्याच्या धुराने संपूर्ण परिसरात प्रदूषण खूप वाढलेले आहे, या पूर्वी देखील कुदळवाडी परिसरात खूप वेळा अश्या घटना घडल्या आहेत.

सुदैवाने कालच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, परंतु जवळ जवळ 60 ते 70 गोदामांना त्या ठिकाणी आग लागलेली आहे सुमारे दिड ते दोन एकर परिसरात ही आग पसरलेली आहे वारंवार अश्या घटना घडून देखील सर्रासपणे त्या ठिकाणी अशी गोदामे चालूच आहेत, तरी देखील प्रशासन त्या ठिकाणी संपूर्ण दुर्लक्ष करत आहे आता तरी प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घालून काम केले पाहिजे. (PCMC)

या संदर्भात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून त्यावर योग्य ती रितसर कायवाही करण्यासाठी लवकरच भेट घेणार आहे.

एमआयडीसी मध्ये स्वतंत्र जागा देऊन नियमानुसार रासायनिक, जळाऊ, घातक कचरा, औद्योगिक वेस्ट विलगीकरण शासनाच्या औद्योगिक सुरक्षितता नियमाप्रमाणे स्वतंत्र भंगार व्हेंडर पार्क केल्याशिवाय नागरी भागातील आगीचे धोके ,आणि संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत असे मनसेचे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, सचिव मनोज लांडगे, संघटक जयसिंग भाट, जय सकट, आझम शेख आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय