पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राजर्षी शाहूमहाराज हे सर्व जाती धर्मातील वंचित, पिडीतांना त्यांचे न्याय्य हक्क देणारे, समानतेने वागवणारे न्यायी राजे होते असे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सांगितले. (PCMC)
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास जिजाऊ ब्रिगेड च्या सुनिता शिंदे, माणिक शिंदे, सुलभा यादव, उज्वला साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे, उपाध्यक्षा माणिक शिंदे, शहराध्यक्षा सुलभा यादव, कामगार नेते काशिनाथ नखाते, ॲड. लक्ष्मण रानवडे, सुनिल रानवडे, सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम, सतिश काळे, वैभव जाधव, अशोक सातपुते, रावसाहेब गंगाधरे आदी उपस्थित होते. pcmc
प्रकाश जाधव म्हणाले की, जगातील पहिले नोकरीतील आरक्षण शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात लागू केले. शिक्षण सक्तीचे व मोफत केले. समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांची जाण असलेले व त्यांची सोडवणूक करणारे ते समाज संशोधक होते.
प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे वसंत पाटील, सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम, आभार जिजाऊ ब्रिगेड च्या शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी मानले.