Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : रहाटणी-पिंपळे सौदागर योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात लवकरच होणार ...

PCMC : रहाटणी-पिंपळे सौदागर योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात लवकरच होणार लोकार्पण – माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली पाहणी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणार्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत पाहणी केली. (PCMC)

नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क साकारण्यात येत आहे, यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, जेष्ठासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे.

या योगा पार्क मधे बनविण्यात आलेली क्लायबिगं वॅाल ही अशिया मधील सर्वात मोठी वॅाल आहे, या वॅाल मध्ये सराव करणारे मुले ही नॅशनल लेवल स्तरावर खेळतील अशी अपेक्षा नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केली. (PCMC)

या पाहणीवेळी शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहशहर अभियंता मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, उद्यान विभागाचे उपअभियंता गोसावी, शिर्के कंपनीचे लावंड, स्वामी, जाधव, शिखर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस श्रीकृष्ण कडुसकर, व इतर सहकारी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय