व्यावसायिकांना, वाहन चालकांना जीवघेणा त्रास…
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : आज पहाटे पिंपरी चिंचवड मध्ये पाऊस् झाला नेहमीप्रमाणे चिंचवड लिंक रोड बिटू पेड शॉप समोर पूर्ण रस्ता तुडुंब भरला वाहन चालकांना जीव घेणी कसरत करून जावे लागत होते तर व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मधुकर बच्चे यांनी माहिती त्वरित पालिका प्रशासानास कळविली.
पहाटे 5 वाजता स्थानिक व्यवसासयिक व नागरिक सुमेध ताम्हाणे, डॉ शिंदे, सागर गदीया, आदिनी पाणी निचरा काढत वाहन चालकांना दिलासा दिला. मागील पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी साठून मोठी समस्या निर्माण झाली होती. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी सदर माहिती प्रशासणास दिली होती व त्या परस्थितीचे गांभीर्य जाणीव करून दिली होती, परंतु नेहमी प्रमाने निष्काळजीपणा व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हा जसा त्यांचा नेहमीचा भाग झाला आहे.
निष्काळजी व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यास कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय समंधित अधिकारी तत्पर होणार नाहीत. लिंक रोड वरील समस्या कधी सुटणार लोक वाट पाहत आहेत, शहरातील पावसाळी पाण्याचे निचरा व्यवस्थापन कोसळले आहे, स्थापत्य विभागाने स्टॉर्म वॉटर लाईन तपसाव्यात, असे जनसेवक, सदस्य: महाराष्ट्र महावितरण समिती सचिव : भाजपा पिं चिं.शहर मधुकर बच्चे यांनी प्रशासनास कळवले आहे.