Monday, July 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड शहरात आज पालखीचे आगमन, आकुर्डीत मुक्काम

PCMC : पिंपरी चिंचवड शहरात आज पालखीचे आगमन, आकुर्डीत मुक्काम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हे यंदाचे ३३९ वे वर्ष आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहोळा शनिवारी (दि.२९) रोजी इनामदार वाड्यातून होईल. आज शनिवार २९ जून रोजी ही पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल, पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे. PCMC

दि .२८ रोजी देहू येथे प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी हजारो वारकर्‍यांनी सकाळपासूनच देहूतील मंदिरात गर्दी केली होती.देऊळवाड्यामध्ये टाळ -मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जप सुरू होता.

जे भाविक वारी सोबत पंढरपूरला जाऊ शकत नाही ते अनेकजण वाटेतच या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेत असतात. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या भागात पालखींच्या वेळापत्रकानुसार वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले जातात.

यंदा देखील पालखीचा मार्ग पाहून काही रोड वाहतूकीसाठी त्या विशिष्ट दिवशी बंद ठेवले जातील आणि काही मार्गांवर ट्राफिक वळवण्यात आले आहे. ट्राफिक पोलिसांकडून त्याची माहिती देण्यात आली आहे. PCMC

दि. ३० जूनला पहाटे आकुर्डी येथून पालखी मुंबई पुणे महामार्गाने पुण्यात दाखल हाेणार असून दाेन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. pcmc

२ जुलैला पालखी सोहळा लाेणी काळभाेरला, ३ जुलैला, ४ जुलैला वरवंड, ५ जुलैला उडंवडी गवळ्याची, ६ जुलैला बारामती शारदा विद्यालय, ७ जुलैला सणसर पालखी तळ, ८ जुलैला पालखी आंथुर्णेत मुक्कामी असून बेलवाडीत दुपारी पहिले गाेल रिंगण हाेणार आहे.

तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या (२९ जून) आळंदी येथून निघणार आहे. ३० जून रोजी पुणे शहरात आगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्या विसाव्याचा दिवस घेणार आहेत. pcmc

संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम निवडुंगा विठ्ठल मंदिरात तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने स्वतंत्र मार्गस्थ होतील.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय