Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेचे शुन्य कचरा आणि स्वच्छ भारत अभियान; आकुर्डीत तीन तेरा,...

PCMC : महापालिकेचे शुन्य कचरा आणि स्वच्छ भारत अभियान; आकुर्डीत तीन तेरा, नऊ बारा

आयुक्त शेखर सिंह साहेब तुमचे लक्ष कुठे आहे (pcmc)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड मनपाने कचरा कुंडी मुक्त शहर करण्यासाठी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या मोठ्या कचरा कुंड्या इतिहासजमा केल्या. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनपाने शहरात विविध उपक्रम राबवले. (pcmc)

झाडे रंगवली, घोषवाक्ये आणि प्रसार मोहिमा राबवून नागरिकांना ओला, सुका कचरा वर्गीकरण तसेच चिकन मटण,मासे विक्रेते, हॉटेल्स यांच्यासाठी खास निर्देश दिले. प्रबोधन करताना मनपा ने विधायक उपक्रम राबवताना अनेक संस्था संघटना यांना बरोबर घेऊन जागृती केली.

मात्र शहरातील नजरेत भरणारे मुख्य रस्ते सोडले तर इतर उपनगरात अनेक रस्त्यावर बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यातून बेजबाबदार नागरिक कचरा रस्त्यावर रात्री बेरात्री आणून टाकत आहेत.

आपले शहर स्वच्छ राहिले पाहिजे, स्मार्ट सिटीचे सौंदर्य रस्त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, ज्या रस्त्यावर खड्डे जास्त त्या रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात येते. मुळात कचरा संकलन करणाऱ्या गाड्या ज्या वेळात येतात, ती वेळ चुकीची आणि काही ठिकाणी नागरिकांच्या अडचणीची ठरत आहे.
कामाला जाणाऱ्या कुटुंबियांच्या घरात साठलेला कचरा कुठे टाकावा हा मोठा प्रश्न रोजंदारी किंवा सकाळी ६ वा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसमोर असतो.त्यावेळेला कचरा संकलन करणारी मनपाची वाहने उपलब्ध नसतात.

आकुर्डीत कचऱ्याचे साम्राज्य

आकुर्डी भजी मंडई समोरील स्वच्छतागृह, आकुर्डी गाव मेन रोड जुनी स्वच्छ्तागृहे तसेच आकुर्डीतील प्रभाकर कुटे मेमोरियल रुग्णालयासमोर नव्या स्वच्छ्ता गृहा समोरच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहेत.

सडलेला दुर्गंधीयुक्त कचरा आणि तो कचरा उचलण्याचा प्रयत्न करणारे ठेका कामगार परेशान आहेत. अशा सडलेल्या कचऱ्यामुळे कोणते आजार होतात, कोणते व्हायरस तयार होतात, ते मनपाच्या वैद्यकीय विभागाला माहीत आहेत. सध्या विविध साथीच्या आजारामुळे रुग्ण खाजगी आणि मनपाच्या दवाखान्यात उपचार घेत आहेत.

आमच्या प्रतिनिधीने आकुर्डी येथील कचऱ्याचे ढीग पाहिले आहेत. हा कचरा इतका सडलेला आहे की, रोज जर असा कचरा उचलण्याची सजा त्या कर्मचाऱ्यांना मिळत असेल तर ते कंत्राटी कामगार आजारी पडतील.

आयुक्त शेखर सिंह साहेब तुम्ही प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना घेऊन आकुर्डीत कचरा रस्त्यावर का फेकला जात आहे, कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांना हे सर्व दिसत नाही का? याची चौकशी करून त्या कचऱ्याचा पंचनामा करा. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना दंड करून प्रश्न सुटणार नाही. मूळ कारणे शोधून काढा. (pcmc)

आणि दररोज महापालिकेच्या वेबसाईटवर एक्स ट्विटर वर रस्त्यावर टाकलेला कचरा आणि त्याचे फोटो पण अपलोड करा.

सर्व काही महापालिकेने करावे असे आमचे म्हणणे नाही, पण मनपा कडे सारे अधिकार आहेत. उपनगरात अनेक ठिकाणी सुंदर रस्त्याच्या फुटपाथवर कचरा टाकणारे असभ्य नागरिक आहेत, याचे पण दुःख वाटते.


संबंधित लेख

लोकप्रिय