Friday, July 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मोशी गंधर्व नगरीतील उद्यान, ओपन जीमचे काम प्रगतीपथावर!

PCMC : मोशी गंधर्व नगरीतील उद्यान, ओपन जीमचे काम प्रगतीपथावर!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
रहिवाशांच्या २० वर्षांपासूनच्या मागणीला यश PCMC


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : गंधर्वनगरी, मोशी येथील उद्यान आणि ओपन जीमच्या काम प्रगतीपथावर आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हे काम सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. pcmc

या भागातील लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी उद्यान आणि नागरिकांना नियमित व्यायाम करण्यासाठी ओपन जीम असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार, येथील नागरिकांनी आमदार लांडगे (Mahesh Landge) यांची भेट घेतली आणि सदर काम मार्गी लावण्याबाबत सूचवले होते. त्यानुसार कामाला सुरूवात करण्यात आली. pcmc


यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सोपान बेळे, उपाध्यक्ष विश्वास पाटील, सतिश गिरी, खजिनदार विनोद काची, सह खजिनदार योगेश रौंदळ, सचिव अमित पवार, सहसचिव महेश माने, कार्यकारणी सदस्य राजकुमार लांडे, अनिल कुमार उपाध्ये, अजित साळवी, अभिराजे, प्रदीप मानकर, प्रवीण सोनार, विश्वंभर शिंदे, दीपक देशमुख, तुषार आंबेकर, राहुल खाडे, सुशांत चतुर्वेदी, स्वामीनाथ ढंगेजी, रोहित खाचणे, राजेंद्र वेणू आदी उपस्थित होते.

उद्यान आणि ओपन जीमच्या कामासाठी संबंधित जागा ही विकसकाकडून महपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली. त्या दोन जागांवर उद्यान व ओपन जीम उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील ओपन जीमसाठी रस्ताओलांडून जाण्याची आवश्यकता स्थानिक नागरिकांना लागणार नाही. लहान मुले व वृद्धांसाठी हक्काचे उद्यान विकसित होत आहे.

आमदार महेश लांडगे यांच्यामुळे परिसराचा विकास

गंधर्वनगरी, मोशी परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र, पायाभूत सोयी-सुविधा अपूर्ण होत्या. आमदार महेश लांडगे यांनी सर्वप्रथम या भागातील ‘बफर झोन’ हटवला.

त्यामुळे नागरी सुविधा सक्षमपणे निर्माण होण्यास गती मिळाली. वीजवाहिनी भूमिगत करणे, पथदिवे, रस्ता काँक्रिटीकरण, स्ट्रॉम वॉटर लाईन, गतीरोधक आणि आता दोन गार्डनचे काम केल्यामुळे स्थानिक नागरीक, रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय