पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारासाठी काळेवाडी-रहाटणी भागातील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. PCMC
उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काळेवाडी (PCMC) येथील श्री ज्योतिबाच्या पादुका समोर पत्रकाची पूजा करून व नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. व मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी शिवसेना उबाठा गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे, आम आदमी पक्षाचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा संतोष मोरे, सुजाता हरेश नखाते, तस्लिम शेख, श्रद्धा शिंदे, अरुणा माने, सुषमा बोरकर, गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, नरसिंग माने, सावताराम महापुरे, भरत शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. pcmc news
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचा मानस आम्ही सर्वांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात जनजागृती करून मतांची टक्केवारी वाढविणार आहे. मतदारसंघात घरा घरात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश आणि “मशाल” चिन्ह पोहचविणार आहोत.
दरम्यान, ही लढाई हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) कार्यकर्ते राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मावळ लोकसभेत परिवर्तनाची “मशाल” नक्कीच पेटवणार, असा विश्वास (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी यावेळी या वेळी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !
मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा
धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू
महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार