Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार लातुरकरांचा स्नेहमेळावा

PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार लातुरकरांचा स्नेहमेळावा

आमदार महेश लांडगे, आमदार अभिमन्यु पवार यांचा पुढाकार (PCMC)

शहर अन्‌ परिसरातील हजारो लातुरकरांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि पंचक्रोशीमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लातूरकर स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा आमदार महेश लांडगे आणि मार्गदर्शक म्हणून अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत. (pcmc)

पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजनगाव, तळेगाव आणि भोसरी एमआयडसी क्षेत्रात तसेच आयटी व सेवा क्षेत्रात मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. गावापासून दूर असलेल्या या लातुरकरांना आपुलकीने एकत्र येता यावे. या करिता ‘‘लातुरकरांचा स्नेहमेळावा’’ आयोजित केला आहे. (pcmc)


भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे गुरूवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ असा दिवसभर हा स्नेहमेळावा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरुअनंतपाळ, रेणापूर आदी भागातील सुमारे २५ हजार नागरिक पुणे आणि सभोवतालच्या परिसरात वास्तव्यास आहेत.

…. असा आहे स्नेहमेळावा

‘‘लातूरकरांचा स्नेहमेळावा’’ दणक्यात साजरा होणार आहे. या निमित्ताने भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार महेश लांडगे आणि मार्गदर्शक म्हणून आमदार अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत. (pcmc)

यावेळी लातुरकरांच्या काही समस्या ऐकूण घेण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू होणार असून, दुपारी स्नेहभोजन आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय