Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कै.शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ अरुण पवार व बालाजी पवार...

PCMC : कै.शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ अरुण पवार व बालाजी पवार यांच्या तर्फे गोशाळेला आर्थिक मदत

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कै. शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार यांनी दातृत्वाची पुन्हा प्रचिती देत गोशाळा चाऱ्यासाठी एक्कावन्न हजारांचा आर्थिक निधी गोशाळेला सुपूर्द केला. (PCMC)

श्री दत्त जयंती जन्मोत्सवा निमित्त कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवा कुंज महोत्सवात ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवाकुंज आश्रमाचे ह.भ. प. शिवानंद स्वामी महाराज यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय (अण्णा) गणपतराव जगताप, ह. भ. प. बब्रुवान वाघ महाराज, ह. भ.प. निवृत्ती महाराज बोरकर ह.भ.प. आदिनाथ शितोळे, ह.भ.प. धारुमामा बालवडकर, कॅप्टन बालाजी पांचाळ, शिवाजी सुतार, किशोर आटरगेकर, नागेश जाधव, प्रल्हाद पायघन, रामकृष्ण भोसले आदी उपस्थित होते. (PCMC)

ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी अरुण पवार व बालाजी पवार यांच्या दातृत्वाचे कौतुक करीत असा दानशूर सुपुत्र निर्माण होणे, हे आई – वडीलांची पुण्याई असते, असे गौरवोद्गार काढले. तसेच पवार बंधूनी आईच्या स्मरणार्थ केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.

ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांनी सांगितले, की अरुण पवार व बालाजी पवार या बंधुनी या अगोदरही अनेक गो-शाळांना चाऱ्याची मदत केली आहे. गोमाता वाचली पाहिजे याच उदात्त भावनेतून अरुण पवार व बालाजी पवार मदत करत असतात. जेवढे माणसांसाठी सेवाकार्य करतात, तेवढेच मुक्या प्राण्यांसाठी सेवाकार्य करत असतात. वन्य प्राण्यांसाठीही खूप मोठी मदत दरवर्षी पवार बंधू करीत आले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय