पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर किवळे रावेत यांनी आपल्या संघ स्थापनेच्या प्रथम वर्षी २१जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून किवळे येथील ओम शांती केंद्राच्या दीदी उपस्थित होत्या. pcmc
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात योग साधना बद्दल महिती देताना महर्षी पतंजली यांच्या अष्टांग योगाची माहिती दिली.यामध्ये कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोगसह राजयोग बद्दल सखोल माहिती दिली. PCMC
सोमेश्वर महिला योगा ग्रुपच्या सर्व महिलांनी योगा प्रात्यक्षिक करून दाखवली.यामध्ये पुरुषांनी देखील सहभाग घेतला. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे, यांनी २१ जून हा कार्यक्रम संघ प्रत्येक वर्षी साजरा करील असे सांगितले. pcmc
परिसरातील नागरिकांनी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.संघाचे उपाध्यक्ष साहेबराव देसले पाटील यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय